भारत वि. ऑस्ट्रेलिया - बंगळुरुतील चौथ्या वन-डेत हे झाले विक्रम

बंगळुरुत झालेल्या चौथ्या सामन्यात हार्दिक पांड्यानं आपल्या वनडेतील 500 धावांचा पल्ला गाठला.

बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला. 65 धावांच्या खेळीत त्यानं पाच षटकार लगावले. दुसरा षटकार लगावताच ऑस्ट्रेलियाविरोधात वन-डेत त्यानं षटकारांच अर्धशतक पुर्ण केलं. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे

कर्णधार म्हणून खेळताना कोहलीनं 36 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार केला. ए.बी. डीव्हिलियर्स (41), क्लार्क (47), धोनी/मॉर्गन (48), गांगुली/इंझमाम (49) आणि व्ही. रिचर्डस् (50) यांच्या नावावर हा विक्रम होता.

बंगळुरुत ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात त्यानं आपल्या वन-डे कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत. कांगारुंचा कर्णधार स्मीथला बाद करताच त्याच्या नावार हा विक्रम झाला. वन-डेमध्ये 100 बळी घेणारा तो भारताचा 18 वा गोलंदाज आहे.

बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं धडाकेबाज शतक झळकावलं आहे. वॉर्नरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना असल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक खास आहे.