भारत-न्यूझीलंडचा पहिल्या टी-20 पूर्वी कसून सराव

एकदिवसीय मालिकेनंतर भारत- न्यूझीलंडमध्ये उद्यापासून तीन टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे.

पहिला टी-20 सामना दिल्लीतील फिरोजशहा कोटलावर होत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी घाम गाळला.

उभय संघात आतापर्यंत पाच टी20 सामने झाले आहेत. सर्व सामन्यात भारताला पराभवचे तोंड पहावे लागले आहे.

नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेतील पराभवाचा न्यूझीलंड हिशेब चुकता करणार का?

उद्या होणाऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन भारत आपल्या विजयाचं खातं उघडणार का?