दुस-या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, 6 गडी राखून केला पराभव

न्यूझीलंडने दिलेलं 231 धावांचं आव्हान 4 गड्यांच्या मोबदल्यात पार करत भारताने पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर खेळवण्यात आलेल्या दुस-या वन-डे सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली

शिखर धवन(68) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 64) यांच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर भारतानं न्यूझीलंडनं दिलेलं 231 धावांचे आव्हान भारतानं 46 व्या षटकांत पार केलं.

या सामन्याच्या सुरुवातीला पिच फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं, त्यामुळे हा सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं.

न्युझीलंडच्या हेन्री निकोल्स आणि डी ग्राण्डहोम वगळता एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही.

वानखेडेवर शतक झळकावणारा रॉस टेलरला या सामन्यात हार्दिक पांड्याने बाद केले. टेलरने ३३ चेंडूत २१ धावा केल्या. कुलदीप यादव एवजी संधी मिळालेल्या अक्षर पटेलने टॉम लॅ..मला पायचीत पकडत संघासमोरचा मोठा धोका दूर सारला.

लॅथम आणि निकोल्स तसेच निकोल्स आणि ग्राण्डहोम यांनी उपयुक् भागिदाऱ्या करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. निकोल्स आणि ग्राण्डहोम यांनी ४७ धावांची भागिदारी केली. निकोल्सने ६२ चेंडूत ४२ धावा केल्या. तर मिशेल सेंटनर याने २९ धावांचे योगदान दिले. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना कानपूर येथे होणार आहे.