तिसरे लग्न केल्याची चर्चा असलेल्या इमरान खानचे या महिलांबरोबर जोडले गेलेय नाव

इमरान खान यांनी तिसरा विवाह केल्याची पाकिस्तानात चर्चा आहे. यापूर्वी इमरान यांनी ब्रिटनमध्ये रहाणा-या जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले. पण नऊवर्षातच त्यांचा संसार मोडला.

1980-90 च्या दशकात झीनत अमान बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिच्याशी सुद्धा इमरान खानचे नाव जोडले गेले होते.

ख्रिस्टोफर सँडफोर्ड यांनी इमरान खानवर बायोग्राफी लिहीली. त्यामध्ये त्यांनी इमरान खानचे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. कारण दोघेही ऑक्सफोर्डमध्ये एकत्र शिकत होते.

इमरान खान यांनी ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही. रेहामन घटस्फोट घेतला आणि पुन्हा मायदेशी परतली.