वर्ल्डकप म्हटलं की हेच डोळ्यासमोर येतं, नेमकं काय ते पाहा...

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1999 साली झालेल्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना तुम्ही कधीही विसरू शकत नाही. कारण हा सामना बरोबरीत सुटला होता आणि सुपर सिक्समधील सामन्यात ऑस्ट्रेलिया वरचढ चढल्यामुळे त्यांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले होते. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियानेच जिंकला होता.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एका सामन्यात तर डकवर्थ-लुईस नियम उघड्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात पावसानंतर दक्षिण आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावांचे आव्हान देण्यात आले होते.

भारतासाठी 2007 चा वर्ल्डकप सर्वात वाईट होता. या वर्ल्डकपमध्ये भारताला बांगलादेशने पराभूत करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.

1996 साली झालेल्या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताच्या प्रेक्षकांनी जाळपोळ केली होती. भारत या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत होता. सचिन तेंडुलकरने या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. पण सचिन बाद झाल्यावर मात्र भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यावेळी इडन गार्डन्समधील चाहत्यांनी स्टेडियमला आग लावत हा सामना बंद पाडला होता.