ICC World Cup 2019 : भारतीय संघातील या 'त्रिकुटाला' मिळू शकते पुढील सामन्यांत संधी!

भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत दबदबा कायम राखताना अपराजित मालिकेसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजला नमवून भारतीय संघाच्या खात्यात 11 गुण झाले आहेत. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना पराभवाची चव चाखवली. न्यूझीलंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला.

शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर लोकेश राहुलवर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे रिक्त झालेल्या चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरने संघात स्थान पटकावले. पण, विजय शंकरला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तळाच्या फलंदाजांवर अतिरिक्त ताण पडलेला पाहायला मिळाला.

विजय शंकरने तीन सामन्यांत केवळ 58 धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 15, अफगाणिस्तानविरुद्ध 29 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 14 धावा केल्या. विजय शंकरची कामगिरी पाहता दिनेश कार्तिकला चौथ्या क्रमांकावर संधी मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

लोकेश राहुललाही फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध 57 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 48 धावांची खेळई केली. शिवाय दक्षिण आफ्रिका ( 26), अफगाणिस्तान ( 30) यांच्याविरुद्ध तो अपयशी ठरला. लोकेश राहुलच्या जागी संघ व्यवस्थापन रिषभ पंतचा सलामीला विचार करू शकतो.

लोकेश राहुलच्या जागी संघ व्यवस्थापन रिषभ पंतचा सलामीला विचार करू शकतो.

केदार जाधवनेही निराश केला आहे. मधल्या फळीत त्याला सातत्यपूर्ण खेळ करता आलेला नाही. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळावी, असी मागणी आहे.