ICC World Cup 2019 : विराट कोहलीला दंड अन् सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ!

साऊदॅम्पट, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : भारतीय संघाने शनिवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवत गुणतालिकेत आगेकूच केली. या विजयापेक्षा अफगाणिस्तान संघाच्या लढाऊ वृत्तीचेच अधिक कौतुक झाले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर नियमभंगाची कारवाई झाली आहे. आयसीसी कलमाच्या पहिल्या स्तरावरील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकणी कोहलीला दंड भरण्यास सांगण्यात आला आहे. त्याला त्याच्या मॅच फीमधील 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. कोहलीच्या ज्या कृत्यामुळे शिक्षा झाली त्यावरून सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ उडाला आहे.