ICC World Cup 2019 : विश्वचषकातील हे आहेत टॉप-5' गोलंदाज

चमिंडा वास हा श्रीलंकेकडून 1996, 1999, 2003 आणि 2007 या चार विश्वचषकांमध्ये खेळला होता. वासने या चार विश्वचषकातील ३१ सामन्यांमध्ये ४९ बळी मिळवले आहेत.

लसिथ मलिंगा हा श्रीलंकेकडून 2007, 2011, 2015 आणि सध्याच्या 2019च्या विश्वचषकातही खेळत आहे. मलिंगाने विश्वचषकातील २६ सामन्यांमध्ये ५१* बळी मिळवले आहेत.

वसिम अक्रम पाकिस्तानकडून 1987, 1992, 1996, 1999 आणि 2003 या पाच विश्वचषकांमध्ये वसिम अक्रमने खेळला. या पाच विश्वचषकांमध्ये 38 सामन्यांत 55 विकेट्स मिळवले आहेत.

मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेसाठी 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 या पाच विश्वचषकात खेळला आहे. मुथय्या मुरलीधरनने आतापर्यंतच्या पाच विश्वचषकात 40 सामन्यांमध्ये 68 बळी मिळवेल आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅग्रा हा 1996, 1999, 2003 आणि 2007 या चार विश्वचषकांमध्ये खेळला होता. या चार विश्वचषकात ग्लेन मॅग्राने 39 सामन्यांमध्ये 71 विकेट्स मिळवले आहेत.