ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरची नवी इनिंग; पाहा फोटो

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेटचा महाकुंभमेळ्याच्या सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडने विजय मिळवला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 104 धावांनी नमवले. पण, या सामन्यात मैदानाबाहेर लक्षवेधी ठरला तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. भारताचा महान फलंदाज तेंडुलकरने या सामन्यात प्रथमच समालोचन केले.