ICC World Cup 2019: जिम आणि फिटनेस डाएट न फॉलो करता मोहम्मद शमीने घटवलं वजन, तुम्हीही ट्राय करा

शमीचे 93 किलो वजन झाले होते. त्यामुळे आता शमी संपला असा कांगावा काही टीकाकारांनी सुरु केला होता. पण शमीने आपल्या कामगिरीतून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

शमीने वजन घटवण्यासाठी जिमचा वापर केला नाही किंवा कोणताही डाएट प्लॅन फॉलो केला नाही. तरीही शमीने आपले वजन कसे घटवले, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.

शमीचे बालपणीचे प्रशिक्षक बदरुद्दीन-सिद्दीकी यांनी त्याला वजन घटवण्यात मदत केली. पण वजन घटवण्यासाठी त्यांनी विदेशी नाही तर देशीपद्धत अवलंबली.

बदरुद्दीन-सिद्दीकी यांनी हे शमीला पहिल्यांदा शेतामध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी शमीला ट्रॅक्टरवर बसवून जमिन नांगरायला सांगितली. त्यानंतर त्यांनी शमीला या शेतामध्ये धावायला लावले.

शमी या शेतामध्ये सकाळी दोन तास आणि संध्याकाळी एक तास धावण्याचा सराव करायचा. या सरावामध्ये शमी 400 मी. धावण्याच्या शर्यतीचा व्यायामही करायचा.

शमी या शेतामध्ये दिवसाला 10पेक्षा जास्त राऊंड धावत मारायचा. कधी कधी तर शमी शेताचे 20 राऊंही धावत मारायचा. या कालावधीमध्ये शमीने काय डाएट फॉलो केली, हे तुम्हाला आता जाणून घ्यायचे असेल...

शमी यावेळी बिर्यानी आणि तेलकट पदार्थांपासून लांब राहीला. यावेळी फक्त साधा आहार तो करायचा. शेतातल्या या ट्रेनिंगने शमीने फक्त काही दिवसांत 6 किलो वजन कमी केले.