ICC World Cup 2019 : 'हे' आहेत अव्वल पाच विकेट टेकर गोलंदाज!

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या. आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.

जोफ्रा आर्चरने 6 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 27 धावांत 3 विकेट्सची कामगिरी त्याची सर्वोत्तम आहे.

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क सहा सामन्यांत 15 विकेट्ससह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 46 धावांत 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.

पाकिस्तानचा मोहम्मद आमीर चार सामन्यांत 13 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 30 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही गोलंदाजाने नोंदवलेली सर्वोत्तम कामगिरी आहे.

इंग्लंडच्या मार्क वूडने पाच सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 18 धावांत 3 बळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

न्यूझीलंडच्या ल्युकी फर्ग्युसनने अफगाणिस्तानविरुद्ध ( 4/37) दमदार कामगिरी करून अव्वल पाचात स्थान पटकावले आहे. त्याने 4 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने 6 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत आणि अफगाणिस्तानविरुद्धची 40 धावांत 3 विकेट्सची कामगिरी त्याची सर्वोत्तम आहे.