वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप फाईव्ह फलंदाज, कोण आहे अव्वल?

इंग्लंडचा मधल्या फळीतील सर्वात भरवशाचा खेळाडू जो रूट हा या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 11 सामन्यांत 556 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावरही दोन शतकं आहेत.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 578 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं 10 सामन्यांत 9 डावांत ही कामगिरी केली आहे. त्यात दोन शतकांचाही समावेश आहे. विलियम्सनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.

बांगलादेशच्या शकीब अल हसनने अष्टपैलू कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं 11 विकेट्स घेतल्या शिवाय 8 सामन्यांत 606 धावाही केल्या. अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या या खेळीत दोन शतकं आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एका धावेनं दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानं 10 सामन्यांत 647 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकांचा समावेश आहे.

भारताच्या रोहित शर्मानं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं 9 सामन्यांत 648 धावा चोपल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. एका वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतक करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.