ICC World Cup 2019 : शकिबनं मिळवला पहिला मान; कोणी राखलीय भारताची शान?

साऊथम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने सोमवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. शकिबने या सामन्यात 51 धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजीत 5 विकेट्सही टिपल्या. अशी दुहेरी कामगिरी करणारा शकीब हा युवराज सिंगनंतरचा दुसरा खेळाडू ठरला.

या विक्रमाबरोबरच शकीबने अजून एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. वर्ल्ड कप स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी अशी कामगिरी करणार शकीब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेत 1000 धावांचा पल्ला ओलांडणारा तो पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. प्रत्येक देशाकडून हा मान कुणी मिळवला ते आपण जाणून घेणार आहोत.

पाकिस्तान- जावेद मियाँदाद

वेस्ट इंडिज- सर व्हिव्ह रिचर्ड्स

ऑस्ट्रेलिया - मार्क वॉ

श्रीलंका - अरविंद डी'सिल्वा

दक्षिण आफ्रिका - हर्षेल गिब्ज

न्यूझीलंड - स्टीफन फ्लेमिंग

बांगलादेश - शकिब अल हसन

भारताकडून हा मान सचिन तेंडुलकरनं मिळवला आहे