ICC World Cup 2019 : एकाच खेळाडूने लगावले सहा देशांपेक्षा जास्त षटकार, कोण आहे तो...

आतापर्यंतच्या विश्वचषकात पाकिस्तान, भारत, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशांनी जेवढे षटकार मारले नाहीत, तेवढे फक्त एका खेळाडूच्या नावावर पाहायला मिळतात.

या खेळाडूने जर एवढे षटकार मारले असतील तर त्याच्या विश्वचषकातील धावा किती झाल्या असतील, याचा जरा विचार करा...

एका खेळाडूने जर एवढे षटकार खेचले असतील, तर विश्वचषकात त्याच्या फटकेबाजीचे चाहते भरपूर असतील.

हा खेळाडू दुसरा कोणीही नसून इंग्लंडचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज इऑन मॉर्गन आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॉर्गनने ७१ चेंडूंत १४८ धावांची तुफानी खेळी साकारली होती. या एका खेळीत त्याने १७ षटकार लगावले होते. या १७ षटकारांसह त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.

मॉर्गनच्या नावावर एका खेळीत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता.

सध्याच्या घडीला मॉर्गनच्या नावावर विश्वचषकात एकूण २२ षटकार लगावले आहेत. पाकिस्तान, भारत, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांनाही अजून एवढे षटकार मारता आलेले नाहीत.