ICC World Cup 2019 : बांगलादेशविरुद्ध इंग्लंडनं केली विक्रमांची आतषबाजी; जाणून घ्या कशी

ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने 6 बाद 386 धावांची खेळी करताना वर्ल्ड कप स्पर्धेतील संघासाठी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या

वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.

जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी करत 2003च्या वर्ल्ड कपचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी मार्व्हन अटापट्टू आणि सनथ जयसूर्या यांचा 126* धावांचा विक्रम मोडला.

रॉयनं 121 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकार खेचून 153 धावांची खेळी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या फलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. 2011मध्ये अँण्ड्य्रू स्ट्रॉसने भारताविरुद्ध 158 धावा केल्या होत्या.

इंग्लंडची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली, त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध एखाद्या संघाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. इंग्लंडने यावेळी भारताचा 370 धावांचा विक्रम मोडला.