ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये कोण आहे 'फिरकी' बहाद्दर, कोण अव्वल?

साऊथम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने सोमवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. शकिबने या सामन्यात 51 धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजीत 5 विकेट्सही टिपल्या. अशी दुहेरी कामगिरी करणारा शकीब हा युवराज सिंगनंतरचा दुसरा खेळाडू ठरला. शकिबने 29 धावा देत 5 फलंदाज बाद केले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील फिरकीपटूची ही सहावी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे.

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनं 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केनियाविरुद्ध 16 धावांत 5 बळी टिपले होते.

झिम्बाबेचा पॉल स्ट्रँगनेही 1996साली 21 धावांत केनियाच निम्मा संघ माघारी पाठवला होता.

पाकच्या आफ्रिदीनं 2011मध्येच कॅनडाच्या पाच फलंदाजांना अवघ्या 23 धावांत तंबूत धाडले होते.

केनियाच्या कॉलिन ओबुयाने 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध 24 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

1996च्या वर्ल्ड कप स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीच्या शौकत दुकानवालाने नेदरलँड्सविरुद्ध 29 धावांत 5 बळी टिपले.

या क्रमवारीत बांगलादेशच्या शकिब अल हसनने अफगाणिस्तानविरुद्ध 29 धावांत 5 विकेट्स घेत एन्ट्री घेतली आहे.