वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप फाईव्ह गोलंदाज, जसप्रीत बुमराह कितवा?

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधित 27 विकेट घेण्याचा मान पटकावला आहे. एकाच स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही त्यानं नावावर केला. स्टार्कने 10 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या आहेत आणि न्यूझीलंडविरुद्ध त्यानं 5 बाद 26 धावांची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 46 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

न्यूझीलंडचा ल्युकी फर्ग्युसन या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 9 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं 37 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

इंग्लंडच्या 24 वर्षीय जोफ्रा आर्चरने पहिलाच वर्ल्ड कप गाजवला. त्यानं 11 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 27 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

बांगलादेशच्या मुश्ताफीजूर रेहमानने 8 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत तो चौथ्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्ध त्यानं 59 धावांत 5 विकेट घेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. पाकिस्तानविरुद्धही त्यानं 75 धावांत 5 फलंदाज बाद केले होते.

भारताचा जसप्रीत बुमराह या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 8 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध 55 धावांत 4 विकेट ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.