हार्दिक पंड्या नुसता हिरोच नाही, तर 'हिरा'लाल सुद्धा...

काही दिवसांपूर्वी हार्दिकने 'कॉफी विथ करण-6' या कार्यक्रमात महिलांबद्दल अश्लील भाष्य केले होते. आता तो नक्की कोणाच्या प्रेमात पडलाय, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.

चहलने पंड्याची एक मुलाखत घेतली. यामध्ये पंड्या प्रेमात पडल्याचे साऱ्यांनाच समजले.

पंड्या सध्या प्रेमात पडलाय तो 'हिरा'च्या...

हिरा हे कोणत्या मुलीचे नाव नाही, तर हिऱ्याच्या दागिन्यांच्या प्रेमात पंड्या पडला आहे.

पंड्याने आपल्या गळ्यात हिऱ्याची चैन घातली आहे.

या चैनमध्ये हिऱ्याची क्रिकेटची बॅट आणि बॉल आहेत.

त्याचबरोबर पंड्या हिऱ्याची अंगठीदेखील वापरतो.

पंड्या हा हिऱ्याच्या दागिन्यांचा शौकिन आहे. त्यामुळेच त्याने बरेच हिऱ्याचे दागिने परीधान केले आहेत.

सामन्यादरम्यानही हार्दिक हे हिऱ्याचे दागिने घालून मैदानात उतरतो.