Happy Birthday Ravi Shastri: 'ऑलराऊंडर' व्यक्तीबद्दल जाणून घ्या या खास गोष्टी

रवी शास्त्री यांचा जन्म 27 मे 1962 साली झाला. रवीशंकर जयरिथा शास्त्री, असे त्यांचे पूर्ण नाव आहे.

वयाच्या 17 वर्षी त्यांनी मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1981 साली त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी पहिला सामना खेळले.

डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

सुरुवातीला दहव्या क्रमांकावर फलंदाजी करणारे शास्त्री हे कांलातराने भारताचे सलामीवीर झाले.

रवी शास्त्री यांनी भारतासाठी 150 एकदिवसीय आणि 80 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले.

ऑस्ट्रेलियामध्ये 1985 झाली झालेल्या चॅम्पियन्स ऑफ चॅम्पिन्स स्पर्धेत ते सर्वोत्तम खेळाडू ठरले होते. त्यावेळी त्यांना Audi 100 ही गाडी भेट देण्यात आली होती.

रवी शास्त्री यांचा 'चपाती' शॉट हा सर्वात प्रसिद्ध होता.

गुडघ्यांच्या दुखापतींमुळे त्यांना तिसाव्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते समालोचनाकडे वळले.

समालोचनानंतर ते भारताचे प्रशिक्षक झाले. आता विश्वचषकासाठी ते भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.