Happy Birthday MS Dhoni: धोनीची 'केस'स्टडी... कॅप्टन कूलच्या 10 कूssल हेअरस्टाइल्स

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट करिअरला सुरुवात केली, तेव्हा अभिनेता जॉन अब्राहमकडून प्रेरणा घेत आपली हेअर स्टाईल अशी लांबलचक केली होती. सुरुवातीच्या काळात लांबलचक केसांमुळे धोनी चर्तेत आला होता.

धोनीच्या खेळाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा धोनीच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील हेअरस्टाईलचीही झाली.

चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने आपल्या जुन्या हेअरस्टाईलसह उंचावलेली ट्रॉफी. धोनीच्या या हेअरस्टाईलचे पाकिस्तानच्या माजी जनरल परवेज मुशर्रफ यांनीही कौतूक केलं होतं.

कॅप्टन कूल धोनीचा हा कूल लूक. धोनीचा असाच एक लूक पाहून एका पत्रकार परिषदेत महिला पत्रकारानेही धोनीला, सर, वैसे आज आप बहुत कूल दिख रहे हो... असे म्हटले होते.

टीम इंडियाने 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने टक्कल केले होते. त्यावेळी टक्कल असलेल्या धोनीचा विश्वचषक उंचावल्याचा हा फोटो व्हायरल झाला होता.

धोनीचा न्यू-स्टाईल लूक सर्वांनाच घायाळ करणारा आहे. आयपीएल हंगामात हार्दीक पंड्याचाही असा लूक चर्चेचा विषय बनला होता. तर, धोनी आणि हार्दीकच्या लूकची तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यात येत आहे.

महेंद्रसिंह धोनीचा गॉगलवाला स्पोर्टस्टार लूक. धोनीच्या या लूकवर कित्येक तरुणी घायाळ आहेत. त्यामुळेच आयपीएलमधील सामन्यात एका तरुणीने धोनी इज माय फर्स्ट लव्ह असा बोर्ड पकडून धोनीला जाहीर प्रपोज केला होता.

धोनीचा हा ओल्ड एज लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पांढरी दाढी वाढलेला, डोळ्यावर गॉगल चढवलेला आणि राऊंड कॅप घातलेला माहीचा ओल्ड एज लूक पाहून अनेकांना धक्काच बसला.

आयपीएल सामन्यांवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हटके लूक. धोनीच्या केस स्टडीतील अर्धी केसं गेलेला सरडास्टाईल लूक.

हा फोटो पाहून केवळ एवढचं म्हणता येईल..... 'कॅप्टन कूल'