भारताच्या अंडर-19 टीमचा विश्वविजयाचा चौकार

डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला.

फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले.

मोहम्मद कैफ, विराट कोहली, उनमुक्त चांद यांच्यानंतर आता पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली भारताने चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला.

पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडमध्ये भारताने अंडर-19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताच्या वेगवेगळया भागात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे.

अंडर-19 संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.