सचिन आणि कांबळी यांच्यातील मैत्री तीस वर्षांमध्ये 'अशी' बदलली

सचिन आणि कांबळी हे शारदाश्रम शाळेकडून खेळत होते. शालेय स्पर्धेत या दोघांनी 664 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.

शालेय क्रिकेट गाजवल्यावर या दोघांनी स्थानिक क्रिकेटमध्येही नेत्रदीपक कामिगरी केली. त्यानंतर या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवले.

कांबळी हा एक गुणवान खेळाडू होता. पण क्रिकेटमध्ये मिळालेले यश त्याला पचवता आले नाही. यानंतर त्याचे पाय जमिनीवर राहीले नाहीत. सचिनला कांबळी एवढे झटपट यश मिळाले नसले तरी तो महान क्रिकेटपटू बनू शकला.

सचिन आणि कांबळी यांच्यामध्ये काही वर्षांपूर्वी विस्तवही जात नव्हता. पण मुंबईच्या ट्वेन्टी-20 लीगच्या व्यासपीठावर हे दोघे बऱ्याच वर्षांनी एकत्र आहे. त्यावेळी कांबळीने चक्क सचिनचे पाय धरले.