दिनेश कार्तिकचा बंगला ठरतोय लक्षवेधी

कार्तिकच्या या बंगल्यात एक मोठा लाउंजही आहे. दिनेश आणि दीपिका आपला जास्त वेळ या लाउंजमध्येच व्यतित करतात.

दिनेश आणि त्याची पत्नी स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल यांनी काही तासांपूर्वी आपल्या बंगल्याचे फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केले. कार्तिकच्या बंगल्याचे फोटो चाहत्यांना चांगलेच पसंत पडत आहेत.

कार्तिकच्या या बंगल्यात छोटेखानी मैदानही बांधलेले आहे. जिथे दिनेश आणि दिपिका काही वेळ काढून क्रिकेट खेळतात.