दिल्लीत पार पडलं विरुष्काचं शाही रिसेप्शन!

दिल्ली येथील ताज डिप्लोमेटिक इंक्लेवमध्ये आयोजित केलेल्या या रिसेप्शनमध्ये देशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

सोहळ्यात विराट-अनुष्का या दाम्पत्याचा अंदाज बघण्यासारखा असून, त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे.

पार्टीत अनुष्का शर्माची साडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अनुष्काची ही साडी वाराणसीच्या पीलीकोठीच्या कारागीरांनी बनवली. तर विराटने काळ्या रंगाची शेरवानी घेतली होती.

अनुष्काची साडी आणि ज्वेलरीचं डिझाईन सब्यासाची केलं असून, त्यांनी त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला.

आता मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.