2017 त या क्रिकेटपट्टूंनी क्रिकेटला केलं 'बाय-बाय'

ट्वेंटी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश केला नाही म्हणून चिडलेल्या अष्टपैलू अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा निषेध करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. 231 एकदिवसीय व 46 कसोटी सामने खेळलाय.

पाकिस्तानच्या ढेपाळलेल्या क्रिकेटविश्वात स्वत:चे स्थान प्रस्थापित करणाऱ्या युनूस खानने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.नोव्हेंबर २०१५ मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून समाधानाने निवृत्ती स्वीकारली.

पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने अखेर 2017त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. ‘बूम बूम’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत 37 धावांत शतकी खेळी करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला

पाकिस्‍तान कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हकने 2017मध्ये निवृत्ती घेतली. विस्डेनच्या वर्षातील 5 सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये मिसबाहचा समावेश झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याच्या कर्णधारपदावर टीका होत होती.

वेस्ट इंडिजच्या 35 वर्षीय अष्टपैलू ड्वेन स्मिथने यावर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्फोटक फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 2003/04 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं होतं

18 वर्ष भारतीय गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे बाळगणाऱ्या आशिष नेहरानं एक नोव्हेंबर रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नेहराने 17 कसोटी, 120 वन-डे आणि 27 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे