वनडे क्रिकेटमध्ये विराटपेक्षा महेंद्रसिंग धोनीच पुढे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरा सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी केली असून, पहिल्या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरा सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला.

तिसरा आणि निर्णायक सामना 18 जानेवारीला मेलबर्नवर खेळवला जाणार आहे. ऍडलेडवरच्या सामन्यात भारतानं 298 धावांचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. धावांचा पाठलाग करताना सरासरीमध्ये धोनीने कोहलीला मागे टाकलं आहे.

धोनीची सरासरी 99.85 होती, तर कोहलीची सरासरी 99.04 इतकी होती. स्ट्राइक रेटमध्ये मात्र कोहलीच सरस ठरला आहे. कोहलीचा स्ट्राइक रेट (98.53) हा धोनीच्या स्ट्राइक रेटपेक्षा(88.80) जास्त आहे.

ऍडलेड वनडे सामन्यापूर्वी विराट कोहली धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त सरासरी असलेल्या फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. परंतु धोनीने 54 चेंडूंत 55 धावा काढत विराटला मागे टाकलं.

या सामन्यात धोनीनं 101.85, तर विराटनं 92.85च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना धोनीची सरासरी 99.85 आहे. जी कमीत कमी 20 डाव खेळणाऱ्यांमध्ये सर्वाधिक आहे.

आतापर्यंत धोनीने 111 सामन्यात धावांचा पाठलाग करताना 2 हजार 696 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहलीनं 80 सामन्यात 4 हजार 853 धावा केल्या आहेत. यात त्याने 21 शतकं तर 19 अर्धशतकं केली आहेत.

याशिवाय धावांचा ऑस्ट्रेलियाच्या मायकल बेवन 86.25, एबी डीविलियर्स 82.77 आणि इंग्लंडच्या जो रूट 77.80च्या सरासरीने आव्हानाचा पाठलाग करताना धावा काढल्या आहेत.