रिषभ पंतची Classic फटकेबाजी

भारताच्या रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली छाप पाडली. पाचव्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव टाळण्यासाठी त्याने लोकेश राहुलसह शर्थीचे प्रयत्न केले. त्याने चौथ्या डावात शतकी खेळी करून विक्रमांनाही गवसणी घातली.

पंतने 114 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कसोटीतील त्याचे हे पहिलेच शतक.

कसोटीच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला.

इंग्लंडमध्ये शतकी खेळी करणाऱ्या पहिल्या भारतीय यष्टिरक्षकाचा मानही पंतने पटकावला.

2007 मध्ये ओव्हल कसोटीत महेंद्रसिंग धोनीने 92 धावांची खेळी केली होती.

षटकार खेचून कसोटीतील पहिले शतक करणारा पंत हा चौथा भारतीय खेळाडू ठरला.

परदेशात शतक करणारा पंत हा दुसरा युवा फलंदाज ठरला. याआधी अजय रात्राने 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अँटिग्वा येथे शतक केले होते.

रात्राने 20 वर्ष 148 दिवसांचा असताना शतक केले होते. पंतने 20 वर्ष 338 दिवसांचा असताना इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली आहे.