14 sixes, 11 fours; चाळीशीच्या 'गेल बॉय'चा जोश

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ४१९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ९७ चेंडूंत १६२ धावा चोपल्या. या खेळीत त्याने ११ चौकार व १४ षटकारांची आतषबाजी केली.

गेलने या सामन्यात वन डेतील १०००० धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण १४ वा आणि दुसरा विंडीज खेळाडू ठरला. ब्रायन लाराने १०००० धावा केल्या आहेत.

३९ वर्षे १५९ दिवसाचा गेल वन डेत १०००० धावा करणारा वयस्कर खेळाडू ठरला. या शिखरासाठी त्याने पदार्पणापासून आतापर्यंत ७११० दिवसांचा कालावधी घेतला.

या सामन्यात १४ षटकार ठोकून गेलने भारताच्या रोहित शर्माचा विक्रम मोडला. गेलने इंग्लंडविरुद्ध ७१ षटकार खेचले आहेत आणि एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याने नावावर केला. रोहितन्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६६ षटकार लगावले आहेत.

एका वन डे मालिकेत सर्वाधिक षटकारांचा विक्रमही गेलने पुन्हा नावावर केला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत त्याने तीन सामन्यात २८ षटकार खेचले. यासह त्याने २०१५ च्या वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक २६ षटकारांचा स्वतःचाच विक्रम मोडला.

वन डे क्रिकेटमधील गेलचे हे २५वे शतक ठरले आणि आतापर्यंतचे सर्वात जलद शतक हेच ठरले. त्याने ५५ चेंडूंत शतकी खेळी साकारली.

पण गेलला विंडीजच्या ब्रायन लाराचा जलद शतकाचा विक्रम मोडता आला नाही. लाराने १९९९ मध्ये बांगलादेश विरुद्ध ४५ चेंडूंत शतक केले होते.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यात गेलने दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला. वन डेतील 300 षटकार पूर्ण केले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 षटकार, विंडीजमधील वन डेतील 4000 धावा, इंग्लंडविरुद्ध 3000 धावा असे अनेक विक्रम गेलने या सामन्यात मोडले.