चेतेश्वर पुजाराने भारताची लाज राखली

भारतीय संघाने पहिल्या दिवशी 9 बाद 250 धावा केल्या

भारताची 4 बाद 41 धावा अशी अवस्था झाली असताना पुजारा धावून आला

पुजाराने 246 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 123 धावा केल्या

ऑस्ट्रेलियातील पुजाराचे हे पहिलेच, तर एकूण 16 वे शतक ठरले

पुजाराने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 16 कसोटी शतकांशी बरोबरी केली

पुजाराने या कामगिरीसह कसोटीतील 5000 धावांचा टप्पा ओलांडला

त्याने 5000 धावांसाठी 108 डाव खेळले आणि राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली

आशिया खंडाबाहेर कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक करणारा तो सहावा भारतीय ठरला