चेन्नई सुपर किंग्जचे 'व्हिसल पोडू' खेळाडू!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्ज ओळखला जातो. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 2010, 2011 व 2018 मध्ये जेतेपदाचा चषक उंचावला. विशेष म्हणजे स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर 2018सालचे जेतेपद पटकावत चेन्नईने दणक्यात कमबॅक केले. 2019 साठी चेन्नईने आपल्या जुन्याच खेळाडूंवर विश्वास कायम राखला आहे. त्यामुळे आयपीएलच्या अन्य हंगामांप्रमाणे यंदाही चेन्नईचा संघ जेतेपदाच्या दावेदारांत आघाडीवर आहे. चेन्नईच्या 'व्हिसल पोडू' खेळाडूंबद्दल जाणून घेऊया...

महेंद्रसिंग धोनी हा चेन्नईचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू... कल्पक नेतृत्व आणि अचुक निर्णय घेण्याची कला... यामुळे धोनी सर्वात वेगळा ठरतो. त्याने 175 सामन्यांत चेन्नईसाठी 4016 धावा केल्या आहेत. त्यात 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 275 चौकार व 186 षटकार खेचले आहेत.

सुरेश रैना : मॅच - 176, धावा - 4985, शतक - 1 , अर्धशतक - 35, 448/4, 185/6, विकेट -25

रवींद्र जडेजा : मॅच - 154, धावा - 1821, 128/4, 61/6, विकेट - 93

मुरली विजय : मॅच - 101, धावा - 2523, शतक - 2, 13/50, 237/4, 90/6

अंबाती रायुडू : मॅच - 130, धावा - 3018, शतक -1, 17/50, 258/4, 113/6

केदार जाधव : मॅच - 65, धावा - 917, 3/50, 73/4, 35/6

मोहित शर्मा : मॅच - 84, विकेट - 90, सर्वोत्तम - 4/14

ड्वेन ब्राव्हो : मॅच - 122, धावा - 1379, 5/50, 108/4, 57/6, विकेट - 136, सर्वोत्तम - 4/22

इम्रान ताहीर : मॅच - 38, विकेट - 53, सर्वोत्तम - 4/28

शेन वॉटसन : मॅच - 117, धावा - 3177, शतक - 4, 16/50, 301/4, 157/6, विकेट - 92

लुंगी एनगीडी : मॅच - 7, विकेट - 11, सर्वोत्तम - 4/10