कॅप्टन स्टिव्हन स्मिथने मोडला सचिन तेंडुलकरचा जलद 21 शतकांचा विक्रम

अॅशेस मालिकेत कर्णधार स्टिव्हन स्मिथने भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही जलद 21 शतकांचा विक्रम मोडला.

स्मिथने आज इंग्लंडविरुद्ध 21 वे शतक झळकावले पण त्याने 105 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली तेच सचिनने 110 डावांमध्ये 21 शतके झळकवली होती.

गवान 21 कसोटी शतके झळकवणा-या फलंदाजांमध्ये स्मिथ आता तिस-या आणि सचिन चौथ्या स्थानावर आहे.

वेगवाने 21 कसोटी शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत.