कॅप्टन कूल युगाचा अस्त

ट्वेंटी-20 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 62 सामन्यांपैकी 36 सामन्यांत भारताने विजय मिळवला. तर 24 सामने भारताला गमवावे लागले. एक सामना बरोबरीत सुटला आणि एक अनिर्णित राहिला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्येही महेंद्रसिंग धोनीने आपल्या कप्तानीची छाप पाडली.

महेंद्रसिंग धोनीने 191 एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते त्यातील 104 सामन्यांत भारतीय संघाला विजय मिळाला. तर 72 सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला. 4 सामने बरोबरीत राहिले उर्वरित 11 सामने अनिर्णित राहिले.

2015 ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि 2016 साली मायदेशात झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकातही त्याच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत झेप घेतली होती.

2013 साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने भारताला विजेतेपद मिळवून दिले होते.

कपिल देवनंतर भारताला विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी दुसरा कर्णधार ठरला.

2007 मध्ये भारताला ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने 2011 साली घरच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

महेंद्रसिंग धोनीने 2007 साली भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

कारकिर्दीच्या सुरुवातीला घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे 2007 साली झालेल्या पहिल्याच ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी अपघातानेच कर्णधारपद चालून आले.

धोनीनंतर विराट कोहलीकडे भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघांचे नेतृत्व सोपवण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले.

यामुळे भारतीय क्रिकेटमधील

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.