या माजी क्रिकेटपटूंची मुलं मैदानात ठरतायत लक्षवेधी

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 18 वर्षीय अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, त्याचबरोबर तडफदार फलंदाजीसाठीही तो प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील एका सामन्यात अर्जुनने 24 चेंडूंत 48 धावांची खेळी साकारली होती. मुंबईच्या संघातून खेळताना 19 वर्षांखालील कुच बिहार क्रिकेट स्पर्धेत रेल्वेविरुद्ध पाच विकेट्स पटकावण्याची किमयाही केली होती.

राहुल द्रविडचा मुलगा समित हा त्याच्यासारखाच फलंदाज आहे. 14 वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत समितने 150 धावांची खेळी साकारली होती आणि त्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.

पाकिस्तानचे माजी फिरकीपटू उस्मान हा ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे. न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना उस्मानने 9 सामन्यांमध्ये 30 बळी मिळवण्याची किमया साधली होती. उस्मान पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघातून खेळला आहे. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली होती.

ऑस्ट्रेलियाचे माजी महान कर्णधार स्टीव्ह वॉ यांचा मुलगा ऑस्टिन हा 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता. या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये त्याने एकूण 32 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर एक बळीही मिळवला होता. गेल्या वर्षी 17 वर्षांखालील स्थानिक स्पर्धेत ऑस्टिनने 122 धावा केल्या होत्या.

मखाया एंटिनीचा मुलगा थांडो याला फलंदाज व्हायचे होते, पण अखेर तो वेगवान गोलंदाज झाला. थांडोने तीन सामन्यांत तीन बळी मिळवले होते, त्याचबरोबर गेल्यावर्षी 4 सामन्यांमध्ये त्याने सात बळी मिळवले होते.