शुभमंगल सावधान! भुवनेश्वर कुमार झाला क्लीन बोल्ड

टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याची बालमैत्रीण नुपूर नागरशी आज लग्नबंधनात अडकला.

भुवनेश्वरचा लग्नसोहळा मेरठमधील एका नामांकीत हॉटेलमध्ये पार पडला.

भुवनेश्वरसाठी कोलकात्यावरुन शेरवानी, तर जयपूरवरुन मोजडी मागवण्यात आली होती, तर त्याच्या बहिणीने दिल्लीवरुन फेटा आणला होता.

पाच डिसेबंरला दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.

नुपूर नोएडामधून बीटेक झाली आहे. नोएडामध्येच ती एका खासगी कंपनीत काम करते.

नुपूर आणि भुवनेश्वरचा साखरपुडा 4 ऑक्टोबरला झाला होता.