IPLच्या 12 व्या मोसमातील Best Bowling!

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील साखळी गटातील सामन्यांचा अंतिम टप्पा सूरू झाला आहे. त्यामुळे प्ले ऑफची चुरस चांगलीच रंगली आहे. फलंदाजांप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजांनीही आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 12व्या मोसमातील आतापर्यंत गोलंदाजांनी केलेल्या काही सर्वोत्तम कामगिरीची आढावा घेऊया...

इम्रान ताहीर - चेन्नई सुपर किंग्सच्या 40 वर्षीय फिरकी गोलंदाजांने आतापर्यंत 16 विकेट्स घेत सर्वाधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 27 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या.

कागिसो रबाडा - दक्षिण आफ्रिकेचा हा गोलंदाज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात जगातील अव्वल फलंदाजांना माघारी पाठवण्याचा पराक्रम केला होता. त्याने 21 धावांत 4 फलंदाज बाद केले होते.

अल्झारी जोसेफ - पदार्पणाच्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळताना 22 वर्षीय गोलंदाजाने 12 धावांत 6 फलंदाज माघारी पाठवून सनरायझर्स हैदराबादचे कंबरडे मोडले होते. आयपीएलमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

कागिसो रबाडा - कोलाकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. त्यात रबाडाने एका षटकात 7 धावा देत एक विकेट घेतली होती. रबाडाचा तो यॉर्कर कोलकाताचा आंद्रे रसेल कधीच विसणार नाही.