...'यांनी'ही केली होती चेंडूची छेडछाड

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीवरही चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण चौकशीनंतर कोहलीने चेंडूशी छेडछाड केली नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले होते.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप लावण्यात आले होते, आयसीसीकडून त्याला दोषीही ठरवले गेले. त्यामुळे त्याच्या मानधनातून 100 रक्कम कापण्यात आली होती.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसवरही चेंडूबरोबर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. बाटलीच्या झाकणाने त्याने चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली होती.

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरवर आतापर्यंत दोन वेळा चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला गेला आहे.