क्रिकेटमधले हे बॅड बॉईज....

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसे रबाडा हा चांगलाच आक्रमक झाला होता. स्टीव्हन स्मिथला बाद केल्यावर त्याने जो आक्रमकपणा दाखवला त्यावर आयसीसीनेही आक्षेप घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा बऱ्याचदा मैदानात आक्रमक राहीलेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वॉर्नर क्विंटन डी काॅकच्या अंगावर धावून गेला होता.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा बऱ्याचदा वाद विवादांमध्ये सापडलेला पाहायला मिळतो. काही दिवसांमध्ये त्याची एका बारमध्ये हाणामारी झाली होती.

भारताचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आक्रमकवृत्तीसाठी सर्वांना परिचीत आहे. आतापर्यंत बरीच प्रकरणे त्याच्या नावावरही आहेत.