विराट कोहलीवर इंस्टाग्राम खूष, पुरस्काराने केले सन्मानित

इंस्टाग्रामवर विराटच्या चाहत्यांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला 'इंस्टाग्राम अवॉर्ड 2017' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इंस्टाग्रामने भारतामध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार सुरु केला आहे. विराटबरोबर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.

विराट आणि दीपिका या दोघांना 2017 साली केलेल्या पोस्टच्या आधारावर हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोहलीच्या पोस्टवर सर्वाधिक लोकांनी कमेंट केली आहे, असे इंस्टाग्रामचे म्हणणे आहे.