अर्जुन तेंडुलकरही होऊ शकतो वडलांसारखा झिरो टू हिरो

सचिन तेंडुलकर : सचिनने 18 डिसेंबर 1989 या दिवशी पाकिस्तामध्ये पदार्पण केले. या सामन्यात सचिन दोन चेंडू खेळला आणि शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम सचिनच्याच नावावर कायम आहे.

महेंद्रसिंग धोनी : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 23 डिसेंबर 2004 साली बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर त्याने भारताला विश्वचषक जिंकवून दिला.

सईद अन्वर : पाकिस्तानचा माजी सलामीवीर सऊद अन्वरने 1990 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला, पण त्यानंतर 194 धावांचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होता.

ग्रॅहम गूच : इंग्लंडच्या ग्रॅहम गूच यांनी 1975 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ते शून्यावर बाद झाले होते. पण त्यानंतर इंग्लंडकडून सर्वाधिक धावा (8900) त्यांच्याच नावावर होत्या.