तोलामोलाच्या जोड्या; 'या' क्रिकेटपटूंच्या पत्नींचं माहेरही गडगंज श्रीमंत

क्रिकेट हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे. मान-सन्मानासोबत या खेळातून खेळाडूंना खूप पैसाही मिळतो. भारतीय क्रिकेटर केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील क्रिकेट फॅन्सच्या मनावर राज्य करतात. काही खेळाडू असेही आहेत जे एका सामन्यात चांगला खेळ करून रातोरात कोट्याधीश होतात. बरं काही खेळाडूंनी खूप पैसा आणि नाव तर कमवलंच पण त्यांच्या पत्नीही त्यांच्यापेक्षा कमी नाहीयेत. काही भारतीय क्रिकेटर्स पत्नी या श्रीमंत घरातील आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या.....

टीम इंडियाचा धमाकेदार फलंदाज रोहित शर्माने २०१५ मध्ये रितीका सजदेहसोबत लग्न केलं. रितीका ही फार श्रीमंत घरातील मुलगी आहे. रितीकाचे वडील कोट्यवधींचा बिझनेस करतात.

टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवान काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचा जीव मानला जात होता. २००४ मध्ये त्याने आरती अहलावत हिच्याशी लग्न केलं. आरतीचे वडील हे प्रसिद्ध वकील आहे.

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनने अंजलीसोबत लव्ह मॅरेज केलं. अंजलीचे वडील आनंद मेहता हे फार मोठे बिझनेसमन आहेत. तर अंजलीची आई ब्रिटीश आहे.

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा यानेही श्रीमंत घरातील मुलीशी लग्न केलं. तशी तर रविंद्र जडेजाची पत्नी मेकॅनिकल इंजिनिअर आहे, पण तिचे वडील कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने भाऊ आहेत. जे फार श्रीमंत आहेत.

टीम इंडियाचा गोलंदाज हरभजन सिंह याने अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केलंय. आता त्यांना एक मुलगीही आहे. गीता ही आधी इंग्लंडमध्ये रहायची. ती सुद्धा एका श्रीमंत घरातून आली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का यांचं लग्न सर्वांनाच माहीत आहे. अनुष्का ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती श्रीमंत घरातील तर आहेच शिवाय स्वत:ही कोट्यधीश आहे.