टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता!

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. भारताच्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराने सामन्यात ( 6/33 व 3/53) नऊ विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1977-78 च्या मालिकेत दोन कसोटी विजय मिळवले होते. तसेच मेलबर्नवरील भारताचा हा ( 1978 व 1981) तिसरा विजय ठरला. 81 सालानंतर म्हणजेच 37 वर्षांनी भारतीय संघाने मेलबर्नवर विजय मिळवला आहे. विशेष गोष्ट म्हणजे सध्याच्या संघातील एकही खेळाडूचा जन्म 1981 साली झालेला नाही.

मयांक अग्रवाल 16 फेब्रुवारी 1991 (27 वर्ष)

हनुमा विहारी 3 ऑक्टोबर 1993 (25 वर्ष)

चेतेश्वर पुजारा 25 जानेवारी 1988 (30 वर्ष)

विराट कोहली 5 नोव्हेंबर 1988 (30 वर्ष)

अजिंक्य रहाणे 6 जून 1988 (30 वर्ष)

रोहित शर्मा 30 एप्रिल 1987 (31 वर्ष)

रिषभ पंत 4 ऑक्टोबर 1997 (21 वर्ष)

रवींद्र जडेजा 6 डिसेंबर 1988 (30 वर्ष)

मोहम्मद शमी 9 मार्च 1990 (38 वर्ष)

इशांत शर्मा 2 सप्टेंबर 1988 (30 वर्ष)

जसप्रीत बुमरा 6 डिसेंबर 1993 (25 वर्ष)