सचिनचं पहिलं शतक आणि शॅम्पेनची बॉटल... 'मास्टर' खेळाडूच्या 'ब्लास्टर' गोष्टी

प्रसिद्ध संगितकार एस.डी बर्मन यांच्या नावावरुन सचिन याचे नाव ठेवण्यात आले आहे.

वयाच्या 14 व्या वर्षी सचिन तेंडुलकरने रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. आजतागत रणजीमध्ये पदार्पण करणारा तेंडुलकर सर्वात तरुण खेळाडू आहे.

सचिन तेंडूलकरला वेगवान गोंलदाज म्हणून नावलौकिक मिळवायचे होते. 1987मध्ये चेन्नईतील अकादमीमध्ये डेनिस लिली यांनी सचिनला वेगवान गोलंदाज म्हणून रिजेक्ट केले होते.

200 कसोटी सामन्यातील 339 डावांमध्ये सचिनने फलंदाजी केली. 200 कसोटीत सचिन तिसऱ्या स्थानावर एकदाही फलंदाजीसाठी आला नाही.

उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा सचिन डाव्या हाताने लिहितो .

संघाने सामना गमावला असतानाही सचिनला सहा वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. असा पराक्रम करणारा सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे.

सचिनने 17 व्या वर्षी कसोटीमधील पहिले शतक झळकावले होते.

विश्वचषकात दोन हजार पेक्षा आधिक धावा काढणारा जगातील एकमेव खेळाडू. 45 सामन्यात 2278 ठोकल्या आहेत.

सचिन तेंडूलकर राहुल द्रविडसोबत 146, अनिल कुंबळे 122, लक्ष्मण 120 आणि सौरव गांगुली सोबत 103 सामन्यात खेळला आहे. सचिन तेंडूलकर आतापर्यंत 108 भारतीय खेळाडूंसोबत खेळला आहे. तर 485 विरुद्ध देशातील खेळाडूंसमोर त्याने फलंदाजी केली आहे.

सचिन तेंडूलकरने 1990मध्ये पहिले शतक झळकावले होते. त्यावेळी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यावेळी सेलिब्रेशनसाठी शॅम्पेनची बॉटल देण्यात आली होती. पण त्यावेळी सचिनचे वय 17 वर्ष असल्यामुळं कायद्याप्रमाणे तो मद्याचा वापर करु शकत नव्हता. 1998 मध्ये मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने शॅम्पेनची बॉटल उघडून पहिल्यांदा सेलिब्रेशन केले होते.

कसोटीमध्ये सचिन आतापर्यंत फक्त एकदा स्टपिंग आऊट झाला आहे. 2001 साली बंगळुरुमध्ये इंग्लडविरुद्ध ऍशले गिल्सच्या गोलंदाजीवर जेम्स फोस्टरने सचिनला यष्टिचीत केले होते.

15 नोव्हेंबर 1989 ते 15 जून 2001 पर्यंत सचिनने सलग 84 कसोटीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.