शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:06 PM2018-02-06T19:06:50+5:302018-02-06T19:10:21+5:30

मुंबई : अर्थसंकल्प सादर झाल्यापासून गंटागळया खाणारा शेअर बाजार अद्याप सावरलेला नाही. मंगळवारी (दि.06) शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली.

सकाळी बाजार उघडण्यापूर्वी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी खाली कोसळला.

मागच्या तीन दिवसांत शेअर बाजारात जी घसरण झालीय त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळी 1,274 अंकांची घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स दीड महिन्यांपूर्वीच्या 33,482 या निचांकी पातळीला पोहोचला, तर निफ्टीचीही 10,276.30 च्या पातळीपर्यंत घसरण झाली.

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 30 शेअर्सच्या इंडेक्समध्ये 2,164.11 अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात शेअर्सची जी विक्री सुरु आहे त्यामुळे बीएसई नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारमुल्यामध्ये 9 लाख 60 हजार 938 कोटींची घट झाली आहे.