सोशल मीडियाचा असा वापर करुन करा भरभरुन कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 03:29 PM2018-06-15T15:29:00+5:302018-06-15T15:29:49+5:30

जर सोशल मीडियात तुमची जबरदस्त फॅन फॉलोइंग असेल तर तुम्हाला त्या माध्यमातून चांगली कमाई करता येते. तुम्ही तुमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्रोफाईल वेगवेगळ्या उत्पादनांसंबंधी पोस्टचं प्रमोशन करुन चांगली कमाई करु शकता.

सोशल मीडिया समाजातील वेगवेगळ्या वर्गांच्या लोकांमध्ये संवाद आणि संपर्काचं प्रभावी माध्यम म्हणून समोर आलं आहे. आजकाल जवळपास सगळेच लोक सोशल मीडियाशी जुळले आहेत. अशात सोशल मीडिया केवळ संपर्क किंवा संवादासाठी न वापरता यातून पैशांचीही कमाई केली जाऊ शकते. चला जाणून घेऊया सोशल मीडियातील रोजगारासंबंधी 6 गोष्टी...

फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही बिझनेसही करु शकता. एक फेसबुक पेज तयार करा ज्यावरुन तुम्ही तुमचं काम करु शकता. जाहीरातींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या उद्योगाचा प्रचार करु शकता. ग्राहक तुमच्याशी थेट संपर्क करु शकतात.

जर सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो करणाऱ्यांची संख्या अधिक असेल तर तुम्ही चांगली कमाई करु शकता. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनांच्या पोस्टचं प्रमोशन करु शकता. यातून तुमची चांगली कमाई होऊ शकते.

जर तुमच्यात काही वेगळं करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातूनही कमाई करु शकता. यावर तुम्ही तुमचं एक चॅनल तयार करु शकता. पण यावर कमाई करण्यासाठी तुमच्या चॅनेलच्या फॉलोअर्शची संख्या जास्त असायला हवी. कारण जितके जास्त क्लीक मिळतील तितकी जास्त कमाई होईल. फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.

फेसबुक वॉलवर एक लिंक पोस्ट करु शकता. त्या लिंकवर क्लीक केल्यास संबंधित कंपनीच्या उत्पादनाची माहिती मिळेल. तुमच्या माध्यमातून कुणी या लिंकवर क्लीक केल्यास आणि ते उत्पादन खरेदी केल्यास तुम्हाला कमीशन मिळू शकतं.

स्वत: एक अॅप विकसीत करुन तुम्ही ते अॅप सोशल मीडियातून प्रमोट करु शकता. जर हे अॅप प्रसिद्ध झालं तर चांगली कमाई होऊ शकते.