'ही' होती धीरूभाईंची प्रेरणा, तिचाच फोटो पाहून करायचे दिवसाची सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:26 PM2018-07-12T17:26:33+5:302018-07-12T17:50:22+5:30

रिलायन्स उद्योग समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही इतर कंपन्यांपेक्षा थोडी वेगळी असते. या सभेत अनेक महत्त्वाच्या चर्चांसोबतच जुन्या आठवणींनाही उजाळा दिला जातो. आताच काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत एका भागधारकाने कंपनीचे संस्थापक धीरूभाईं अंबानी यांच्याबाबत एक खास गोष्ट सांगितली आहे. ती जाणून घेऊया.

धीरूभाई हिराचंद अंबानी यांनी व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूहाची स्थापना केली.

धीरूभाई अंबानी हे आपल्या दिवसाची सुरुवात ही त्यांची लाडकी नात ईशाचा फोटो पाहून करायचे.

ईशा अंबानी ही रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या आहे.

धीरूभाई अंबानी यांचे ६ जुलै २००२ रोजी निधन झाले होते. त्यावेळी ईशा फक्त 11 वर्षांची होती.

23 ऑक्टोबर 1991ला ईशाचा जन्म झाला. रिलायन्स जिओच्या विस्तारात ईशाचाही मोलाचा वाटा आहे.

ईशाने येल युनिव्हर्सिटीच्या सायकोलॉजी व साऊथ एशियन स्टडिजमध्ये पदवी संपादन केली आहे.

ईशा पिरामल कुटुंबाची सून होणार आहे. पिरामल समूहाचे संस्थापक अजय पिरामल यांचे चिरंजीव आनंद पिरामल याच्याशी ईशाची लग्नगाठ बांधली जाणार आहे.

ईशा डिसेंबरमध्ये आनंदबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत.