मॉ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:28 AM2018-01-13T00:28:09+5:302018-01-13T00:47:47+5:30

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून माँ जिजाऊंना अभिवादन केले. शुक्रवारी पहाटे ५.४५ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व इतर मान्यवरांनी माँ जिजाऊंचे पूजन केले.

माँ जिजाऊं ना अभिवादन करताना नगराध्यक्ष अँड. नाझेर काजी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे आदी.

राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करताना खासदार सुप्रिया सुळे, माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी व अन्य.

राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आपच्या कीर्ती मेमन, ब्रिगेडिअर सुधीर सावंत व अन्य.

माँ जिजाऊंना अभिवादन करताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार आकाश फुंडकर, धृपतराव सावळे, विनोद वाघ आदी.

राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करताना पशुसंवर्धन मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार शशिकांत खेडेकर, शिवप्रसाद ठाकरे, संजय मेहेत्रे आदी.

- माँ जिजाऊंना अभिवादन करताना स्वाभिमानीचे रविकांत तुपकर व कार्यकर्ते.

जिजाऊ सृष्टीवर संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना लेफ्टनंट स्वाती महाडीक यांचे कुटुंबीय.

शिवधर्म पीठावर ध्वजारोहणाप्रसंगी उपस्थित आमदार शशिकांत खेडेकर व अन्य.

एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन करणार्‍या मातांचा यावेळी ना. पंकजा मुंडे, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ भक्तांची अशी गर्दी उसळली होती.

जिजाऊ जन्मोउत्सवानिमित्त राजवाडा परिसरात जिजाऊ भक्तांनी रेखाटलेली रांगोळी.

जिजाऊ जन्मोउत्सवानिमित्त राजवाडा परिसरात जिजाऊ भक्तांनी रेखाटलेली रांगोळी.

जिजाऊ सृष्टीवर अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनेक शालेय विद्यार्थ्यांनी माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आदिंच्या वेशभुषा साकारल्या होत्या.

जिजाऊ जन्मोउत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे जाणार्‍या भक्तांना खिचडी वाटप करताना डोणगाव येथील जिजाऊ भक्त.