कॅटरिना कैफसोबत या अंदाजात दिसला ‘झिरो’चा हिरो शाहरुख खान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 03:42 PM2018-12-12T15:42:26+5:302018-12-12T15:45:43+5:30

शाहरुख खान व कॅटरिना कैफ अलीकडे मेहबूब स्टुडिओबाहेर दिसले. तूर्तास शाहरुख व कॅटरिना आपल्या ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.

दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते आतूर आहेत.‘झिरो’ या चित्रपटात कॅटरिना कैफ बबीता कुमारीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आज ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत. या लेटेस्ट गाण्यातील कॅटरिनाच्या सेक्सी डान्स मुव्ह वेड लावणाºया आहेत. रिलीज झालेल्या गाण्यात शाहरुखला लग्नाची हळद लागतेय आणि दुसरीकडे बबीता कुमारी आपला जलवा दाखवतेय.

शाहरुख व कॅटरिना या दोघांनी यापूर्वी ‘जब तक है जान’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. शाहरुख खान या चित्रपटात बऊआ सिंग या बुटक्या व्यक्तिचे पात्र साकारणार आहे. अनुष्का शर्माही या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

अनुष्का, कॅटरिना व शाहरूख यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात पाहायला मिळणार आहे. नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.