कृति खरबंदाला ब्लॅक बोल्ड अवतारात पाहून व्हाल तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:55 PM2019-03-29T19:55:50+5:302019-03-29T19:58:27+5:30

अभिनेत्री कृति खरबंदा सध्या आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'मुळे चर्चेत आहे. ती नुकतील जुहू येथे बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली.

या चित्रपटात कृति व्यतिरिक्त अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति सेनॉन, पूजा हेगडे, चंकी पांडे व बोमण ईरानी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

'हाऊसफुल४' चे दिग्दर्शन फरहाद समजी करत असून साजिद नाडियादवाला निर्मिती करतो आहे.

या चित्रपटाव्यतिरिक्त कृति लवकरच पागलपंती चित्रपटातही दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे.

'पागलपंती'मध्ये कृतिसोबत जॉन अब्राहम, अनिल कपूर, अर्शद वारसी, पुलकित सम्राट व इलियाना डिक्रुझ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

शेवटची कृति यमला पगला दीवाना फिर से सिनेमात पाहायला मिळाली होती.

'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितका कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल व धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते.