मालदीवमध्ये मलायका अरोराचा बोल्ड अंदाज, स्विमिंग पूलजवळ केला योगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:32 PM2019-04-01T16:32:48+5:302019-04-01T16:38:20+5:30

मलायका अरोराने सोशल मीडियावर हॉट योगा करतानाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

मलायका गेले काही दिवस मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे.

मलायकाच्या या फोटोंसोबत ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

मलायका व अर्जुन यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

मलायका आणि अर्जुन या महिन्यात १९ एप्रिलला विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे मलायकाने सांगितले.

अरबाज खानसोबत १७ वर्षे संसार केल्यानंतर मलायकाने घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका व अर्जुनच्या अफेयरच्या चर्चेला उधाण आले.

मलायका व अर्जुन यांच्या वयात बारा वर्षांचे अंतर आहे. अर्जुन मलायकापेक्षा लहान आहे.

मलायकाने मालदीवमधील शेअर केलेल्या फोटोमध्ये हॉट व ग्लॅमरस दिसते आहे.