वरूण धवन झाला फिटनेस फ्रिक, दिसला जिमबाहेर तेही बनाना डाएट करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:46 PM2019-04-03T19:46:11+5:302019-04-03T19:48:28+5:30

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता वरूण धवन सध्या आगामी चित्रपट 'कलंक'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. व्यस्त शेड्युलमध्ये देखील तो त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देताना दिसतो आहे.

यादरम्यान वरूण जिममधून बाहेर पडताना दिसला आणि कारमध्ये केळे खाताना पाहायला मिळाला.

नुकताच त्याचा आगामी चित्रपट 'कलंक'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली. या गाण्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

या चित्रपटात वरूणसोबत आलिया भट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा व आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' चित्रपट १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शेवटचा वरूण 'सुई धागा' चित्रपटात अनुष्का शर्मासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता.

'सुई धागा' चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.